पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया-युक्रेन युद्धाचा ( RUSSIA-UKRAINE WAR ) आज २६ वा दिवस आहे. कोणत्याही परिस्थितीत शस्त्र खाली ठेवणार नाही, असे युक्रेनने स्पष्ट केले आहे. रशियाने हल्ले सुरुच ठेवले आहेत. रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सुमीतील रासायनिक प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. अमोनिया गॅसची गळती सुरु झाल्याने युक्रेनने सरकारने शहरातील नागरिकांना भूमिगत होण्याचे आवाहन केले आहे.
सुमीचे गव्हर्नर दिमित्रो जियवेत्स्की यांनी सांगितले की, आज पहाटे साडेचार वाजता रशियाने हवाई हल्ला केला. यामुळे सुमी शहरातील रासायनिक प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. अमोनिया गॅसची गळती सुरु झाली, सुमारे अडीच किलोमीटरहून अधिक परिसराला याचा फटका बसला . परिसरातील नागरिकांना भूमिगत होण्याचे आवाहन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेन आपत्तकालीन सेवेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळै अनेक ठिकाणी आग लागली. आगीत होरपळून चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचलं का?