जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत

नुकसानभरपाई निधी www.pudhari.news
नुकसानभरपाई निधी www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मार्च २०२३ मध्ये झालेल्या बेमोसमी पावसामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी राज्यशासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे २० कोटी ४२ लाखांची मदत भरपाई दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात बेमोसमी पावसासह गारपीट, वादळामुळे रब्बी तसेव उन्हाळी हंगामातील शेतपिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान दोन हेक्टरपर्यंत तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात नुकसानीचे तातडीन पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने मदत निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला असून राज्य शासनाकडून जळगाव जिल्ह्यासाठी २० कोटी ४२ लाख ६१ हजार रूपयांचा निधीचे वितरण करण्यात आले आहे. ४ ते ८ मार्च, ६ ते १९ मार्च, या कालावधीत पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. यात जळगाव जिल्ह्यात १८ हजार ३६४ शेतकऱ्यांचे ११ हजार ९९१. ९ हेक्टर शेती क्षेत्राचा समावेश आहे.

तालुकानिहाय नुकसान आकडेवारी अशी…

जिल्ह्यात बेमोसमी पावसामुळे रब्बी व उन्हाळी हंगामातील तसेच बागायती पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभाग स्तरावरून तातडीने करण्यात येवून शासनाला नुकसान भरपाईचा अहवाल पाठविण्यात आला. यात जळगाव १३९, भुसावळ २२०, यावल १३५, रावेर ५३१, मुक्ताइनगर १०२६, बोदवड ६८, पाचोरा १६६, भडगाव १२२४, चाळीसगाव १४५३, जामनेर १९४, अमळनेर १२७८, एरंडोल १९३७, धरणगाव ६४०२, चोपडा ३२७४, पारोळा ७१७ असे सुमारे १८ हजार ३६४ शेतकऱ्यांचे ११ हजार ९९१. ९ हेक्टरवरील रब्बी ज्वारी, बाजरी, मका यासह केळी, लिंबू आंबा आदी फळबागांचे नुकसान नोंद झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान दोन हेक्टरपर्यत नुकसान भरपाईपोटी २० कोटी ४२ लाख ६१ हजार रूपये मदत वितरीत करण्यात आली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news