Weather warning: कोकणात उष्णतेची लाट; विदर्भावर गारपिटीचे संकट! | पुढारी

Weather warning: कोकणात उष्णतेची लाट; विदर्भावर गारपिटीचे संकट!

पुढारी ऑनलाईन: पुढील चार दिवस मध्य आणि पश्चिम भारतातील कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होणार आहे. दरम्यान आज (दि.१९) कोकण आणि गोवा किनारपट्टीला उष्णतेच्या लाट (Weather warning) येण्याची शक्यता आहे. तर गुरुवार, २० एप्रिलला विदर्भाला गारपिटीचा फटका बसेल, अशी शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्‍ये तापमानात वाढ होताना दिसत आहे. भारताच्या उत्तरेकडील राज्यात तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये विजांच्या कडकडाटांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस (Weather warning) पडणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने काश्मीरमध्ये पावसाला सुरुवात झाली. मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक वारा खंडितता ही प्रक्रिया सुरू झाल्याने उत्तरेकडून थंड, तर दक्षिणेकडून दमट वारे येऊन त्यांची महाराष्ट्रात भेट होत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेसह वादळी पाऊस पडेल.  राज्यात  २४ एप्रिलपर्यंत असेच वातावरण राहील (Weather warning) असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button