धुळे : वीज अंगावर पडल्याने एक गंभीर जखमी | पुढारी

धुळे : वीज अंगावर पडल्याने एक गंभीर जखमी

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्यातील चौपाळे पैकी गारखडी या गावात सकाळी साडे नऊ वाजता पिंपळनेर येथील व्यापारी दिनेश (बंडू) सोमनाथ कोठावदे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते गंभीर जखमी झाले.

सकाळी पिंपळनेरसह पश्चिम पट्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण झाले. विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू होता. रोहड येथे आज आठवडे बाजार व गारखडी यात्रा असल्याने पिंपळनेर येथील भुसार व्यापारी दिनेश उर्फ (बंडू) सोमनाथ कोठावदे हे नेहमी प्रमाणे रोहड मार्गाने गारखडी येथे जात अतानाना अचानक वीज पडल्याने दिनेश रस्त्याच्या बाजूला १० फुटा पर्यंत फेकला गेला. त्यात दिनेश यांच्या अंगावर वीज पडल्याने ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी दिनेश यांना जवळच्या रोहड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर प्राथमिक उपचार करून पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे औषधोपचार करुन आता डाॅ. जितेश चौरे यांच्यावर खाजगी सुहरी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान दिनेश यांची प्रकृती स्थिर असून महसुल विभागाने पंचनामा केला आहे.

घटनेची माहिती मिळताच माजी खासदार बापूसाहेब चौरे, जि.प.सदस्य विश्वास बागुल, मार्केट कमिटीचे सदस्य गजेंद्र कोतकर, माजी सभापती गणपत चौरे, प्रवीण चौरे, भानुदास गांगुर्डे यांनी गणेश यांची विचारपूस केली.

हेही वाचा :

Back to top button