Rohit-Virat t20I Journey End : विराट-रोहितसाठी टी-20 संघाचे दरवाजे बंद होणार, कोच राहुल द्रविडचे मोठे संकेत

Rohit-Virat t20I Journey End : विराट-रोहितसाठी टी-20 संघाचे दरवाजे बंद होणार, कोच राहुल द्रविडचे मोठे संकेत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit-Virat t20I Journey End : भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंसाठी भारतीय टी-20 संघाचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यासाठी संघाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या विधानाचा दाखला देण्यात आहे.

पुणे येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर द्रविड म्हणाले की, आमचे संपूर्ण लक्ष आता फक्त अगामी वन डे विश्वचषक स्पर्धा आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आहे. टी-20 संघात फक्त युवा खेळाडूंनाच संधी दिली जाईल आणि त्यांना आजमावण्याची ही चांगली संधी आहे.

रोहित आणि विराटला आता फक्त एकदिवसीय आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे द्रविड यांनी नाव न घेता स्पष्ट केले आहे. या वर्षाच्या अखेरीस वन डे विश्वचषक भारतात होणार आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे चार कसोटी सामने खेळायचे आहेत. हे सर्व सामने जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामुळे संघाला डब्ल्यूटीसीची फायनल गाठणे सहज शक्य होणार आहे. (Rohit-Virat t20I Journey End)

ऑस्ट्रेलियात मागिल वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला इंग्लंडकडून 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. यादरम्यान, भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यावर टी-20 मालिका खेळली, ज्यामध्ये हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. आता हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध सलग दुसरी टी 20 मालिका खेळत आहे. अशा परिस्थितीत फक्त हार्दिकलाच पुढील टी-20 कर्णधार बनवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (Rohit-Virat t20I Journey End)

सामन्यानंतर कोच द्रविड काय म्हणाले? (Rohit-Virat t20I Journey End)

द्रविड म्हणाले, 'शेवटच्या उपांत्य फेरीत (T 20 World Cup) खेळलेल्या भारतीय संघातील केवळ 3-4 मुले या सामन्याच्या (Sri Lanka) प्लेइंग-11 मध्ये खेळत आहेत. पुढील टी 20 वेळापत्रक लक्षात घेऊन आम्ही पूर्णपणे वेगळ्या टप्प्यावर आहोत. आमचा संघ पूर्णपणे युवा असून श्रीलंकेसारख्या बलाढ्य संघासोबत खेळण्याचा अनुभव चांगला राहिला आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे आमचे संपूर्ण लक्ष वन डे विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आहे. अशा परिस्थितीत टी-20 ने आम्हाला या युवा खेळाडूंना आजमावण्याची चांगली संधी दिली आहे.'

टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी केलेल्या या विधानानंतर रोहित-विराट यांचे टी-20 आंतरराष्ट्रीय संपुष्टात येणार की काय अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news