लखनौ : देशात प्रथमच एखाद्या सरकारी रुग्णालयात रोबोटिक सर्जरीने 'थायरॉईड कॅन्सर' (Robotic surgery on thyroid cancer) दूर करण्यात यश मिळाले आहे. लखनौच्या 'संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेज'च्या डॉक्टरांनी रोबोटिक उपकरणाद्वारे पॅपिलरी थायरॉईड कॅन्सरने ग्रस्त असलेल्या 21 वर्षांच्या एका तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. भारतात प्रथमच सरकारी संस्थेत रोबोटिक सर्जरीद्वारे कर्करोगयुक्त थायरॉईड ग्रंथीला पूर्णपणे हटवण्यात आले असल्याचे या रुग्णालयाने म्हटले आहे.
प्रयागराजची रहिवासी असलेल्या या रुग्ण तरुणीच्या शरीरात कर्करोगाची (Robotic surgery on thyroid cancer) गाठ बनली होती. कमला नेहरू कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तिच्या या कर्करोगाचे निदान झाले होते. लखनौच्या रुग्णालयात रोबोटिक थायरॉईड सर्जन डॉ. ज्ञान चंद यांनी सांगितले की, गुंतागुंतीच्या स्थितीमुळे गळ्यावर चीर पाडल्याशिवाय शस्त्रक्रिया करणे हे प्रयागराजमधील रुग्णालयात शक्य नव्हते. त्यामुळे तिला लखनौमध्ये आणण्यात आले. या तरुणीच्या गळ्यातील गाठ सतत वाढत होती.
मात्र आता या शस्त्रक्रियेनंतर ती बरी झाली आहे. लखनौमधील या रुग्णालयात निदान झाले होते की, तिला पॅपिलरी थायरॉईड कॅन्सर (Robotic surgery on thyroid cancer) आहे आणि तो रोबोटिक सर्जरीने हटवता येऊ शकतो. रुग्णाच्या कुटुंबीयांच्या संमतीनंतर डॉ. ज्ञान चंद आणि त्यांच्या टीमने चार तासांच्या या ऑपरेशनमध्ये कोणतीही चीर न पाडता रुग्णाच्या गळ्यातील कर्करोगयुक्त थायरॉईड ग्रंथीसह अनेक गाठींना यशस्वीपणे बाहेर काढले.
हेही वाचा :