Sex Slave : ब्रिटनमधील पोलिस अधिकार्‍याने बारा जणींवर लादली लैंगिक गुलामी | पुढारी

Sex Slave : ब्रिटनमधील पोलिस अधिकार्‍याने बारा जणींवर लादली लैंगिक गुलामी

लंडन, वृत्तसंस्था : ब्रिटनमधील एका पोलिस अधिकार्‍याने 20 वर्षांच्या कारकिर्दीत 80 हून अधिक लैंगिक गुन्हे केले. 2003 ते 2020 दरम्यान नोकरीत असताना 24 महिलांवर बलात्कार आणि 12 हून अधिक महिलांना लैंगिक गुलाम sexual slavery : ब्रिटनमधील पोलिस अधिकार्‍याने बारा जणींवर लादली लैंगिक गुलामी) (सेक्स स्लेव्ह) बनवल्याप्रकरणी डेव्हिड कॅरिक याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. गुलाम केलेल्या महिलांना तो विवस्त्र अवस्थेत सफाईपासून ते घरातील इतर कामे करायला भाग पाडत असे.

स्वत: डेव्हिडने या दुष्कृत्यांची कबुली दिली आहे. कॅरिक आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत असे. पोलिस अधिकारी असल्याचा दम देऊन महिलांना घाबरवून सोडत असे. डेव्हिड मला विवस्त्र करून माझ्या सर्वांगावर लघुशंका करत असे, असेही एका पीडित महिलेने डेव्हिडविरुद्ध दिलेल्या आपल्या जबाबात नमूद केले आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, एका महिलेला डेव्हिडने 10 तास एका कपाटात कोंडून ठेवले होते. गुलाम म्हणून कैद केलेल्या महिलांना तो बेल्टने मारायचा. 2000 ते 2021 दरम्यान मेट्रोपॉलिटन पोलिसांकडे डेव्हिडविरोधात 9 वेळा लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी आल्या, मात्र विविध कारणांनी त्याच्यावर कारवाई झाली नाही. 2021 मध्ये एका महिलेने डेव्हिडचा पिच्छाच पुरविला. ती मीडियासमोरही आली. नंतर इतर महिलाही पुढे आल्या. डेव्हिडने 20 वर्षांच्या पोलिस सेवेदरम्यान अनेक गुन्हे केले, हे आता पोलिस विभागानेही मान्य केले आहे.

Back to top button