पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने २०२२ मधील रस्ते अपघातांची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार, देशात मागील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये रस्ते अपघातात तब्बल १.६८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे 4.45 लाख लोक जखमी झाले आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेली ही आकडेवारी चिंता वाढवणारी ठरली आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या अहवालानुसार, २०२२ या वर्षात भारतात एकूण 4,61,312 रस्ते अपघातांची नोंद झाली. या अपघातांमध्ये 1,68,491 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या रस्ते अपघातांमध्ये सुमारे 4.45 लाख लोक जखमी झाले आहेत. 'भारतातील रस्ते अपघात – 2022' शीर्षकाच्या अहवालात 2021 च्या तुलनेत भारतात अपघातांची संख्या सुमारे 12 टक्क्यांनी वाढली आहे तर रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या 9.4 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये जखमी लोकांच्या संख्येत 15.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पोलिसांद्वारे सामायिक केलेल्या माहितीच्या आधारे MORTH रस्ते अपघातांवरील हा वार्षिक अहवाल तयार करते.
हेही वाचा