Road accident: गेल्या वर्षभरात राज्यात १५ हजारांहून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या वर्षभरात २०२२ मध्ये राज्यात १५ हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात (Road accident) मृत्यू झाला आहे. यापैकी ५७ टक्के हे दुचाकीचालक होते, तर २१ टक्के पादचारी असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
महाराष्ट्र पोलिसांकडून दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२३ पर्यंत राज्यात ४९२२ लोकांचा रोड अपघातात मृत्यू झाला आहे. जवळपास ६,८४५ लोक रोड अपघातात जखमी (Road accident) झाले असल्याचे देखील महाराष्ट्र पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
In the year 2022, more than 15,000 people died due to road accidents in Maharashtra. 57% of the people who die in road accidents are bikers and 21% are pedestrians. From January 2023 to April 2023, 4,922 people have died due to road accidents in the state while 6,845 people were… pic.twitter.com/GVXtCmcU1E
— ANI (@ANI) May 24, 2023
राज्यात जानेवारी २०१८ ते एप्रिल २०२३ या सव्वापाच वर्षांच्या कालावधीत १ लाख ६७ हजार ७०० रस्ते अपघातांमध्ये (Road accident) ७१ हजार ३१९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक दुचाकीचालकांचा समावेश असून, पादचाऱ्यांच्या मृत्यूचेही प्रमाण लक्षणीय आहे.