

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीत फुटपाथवर झोपलेल्या सहाजणांच्या अंगावरुन ट्रक गेला. या घटनेत (Delhi Road Accident) चारजण ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतांची आणि जखमींची ओळख पटली आहे. मृतामध्ये करीम (५२ वर्षे), छोटे खान (२५ वर्षे), शाह आलम (३८ वर्षे), राहूल (४५ वर्षे). तर जखमीपैकी मनिष (१६ वर्षे) आणि प्रदीप (३० वर्षे) हे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार (Delhi Road Accident) हा भीषण अपघात दिल्लीतील सीमापुरी भागातील डीटीसी डेपो रेडहायलाईट जवळ झाला. येथे फुटपाथावर सहाजण झोपले असता. एक भरधाव ट्रक त्यांच्या अंगावरुन गेला. हा अपघात एवढा भीषण होता की, यात सहापैकी चारजण ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहेत. पुढील तपास दिल्ली पोलिस करत आहेत.
घटनेचे सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
हेही वाचलंत का?