Jammu Accident : जम्मू-श्रीनगर महामार्गावर अपघात; चार जणांचा मृत्यू | पुढारी

Jammu Accident : जम्मू-श्रीनगर महामार्गावर अपघात; चार जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-श्रीनगर महामार्गावर झालेल्या ट्रक अपघातात चार जणांचा मृत्यू. हा अपघात  जम्मूच्या झज्जर कोटली भागात झाला. असुन ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने खड्ड्यात पडला आणि हा अपघात झाल्याचे स्पष्ट आले आहे.

माहितीनुसार, श्रीनगरहून राजस्थानकडे ट्रक जात होता. दरम्यान जम्मू-श्रीनगर महामार्गावर झज्जर कोटली भागाजवळ वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक खड्ड्यात पडला. यात चार जणांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,”श्रीनगरहून राजस्थानकडे जाणाऱ्या ट्रकवरील ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाच्या दुभाजकाला धडकला आणि खड्ड्यात पडला. या अपघातात ट्रक चालक व वाहक जागीच ठार झाले आहेत. पोलिसांचे पथक आल्यावर इतर दोन मृतदेह सापडले. मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. मृतांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button