Riya Kumari : अभिनेत्री-यूट्यूबर इशा आलियाची गोळ्या झाडून हत्या

riya kumari
riya kumari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडची अभिनेत्री आणि यूट्यूबर रिया कुमारी (Riya Kumari) उर्फ इशा आलियाची (Isha Alia) गोळ्या झाडून हत्या झाली. ती कारने कोलकाता जात होती. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये हावडा येथे सका‍ळी चोरट्यांनी हायेवर कार थांबवून लुटण्याचा प्रयत्न केला. जेव्हा हा प्रयत्न फसला तेव्हा तिची हत्या केली. (Riya Kumari) स्थानिक चित्रपट आणि व्हिडिओ अल्बममध्ये ती काम करत होती. (Isha Alia )

पोलिसांच्या माहितीनुसार, "यूट्यूबर आणि अभिनेत्री रिया कुमारी (riya kumari) चित्रपट निर्माते पती प्रकाश कुमार आणि आपल्या २ वर्षाच्या मुलीसोबत कोलकाता जात होती. राष्ट्रीय महामार्ग १६ वर सकाळी ६ वाजता ते प्रात:विधीसाठी थांबले होते. तेव्हा तीन लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरटे साहित्य लुटण्याचा प्रयत्न करत होते. पण, विरोध केल्याने त्यांनी इशावर गोळ्या झाडून तेथून पलायन केले.

पतीचीदेखील चौकशी करत आहेत पोलिस

पोलिसांच्या माहितीनुसार, कुमारने आपल्या पत्नीसाठी स्थानिक लोकांकडे मदत मागितली. काही लोकांनी इशाला उलुबेरियातील एससीसी मेडिकल कॉलेज-मेडिकलला घेऊन जाण्यासाठी मदत केली. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिस या घटनेचा तपास करत असून इशाच्या पतीची देखील चौकशी करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news