‘माझी बॅग तेवढी लगेच आणा’; मोहम्मद सिराजचे ट्विट चर्चेत | पुढारी

‘माझी बॅग तेवढी लगेच आणा’; मोहम्मद सिराजचे ट्विट चर्चेत

नवी दिल्ली : भारताने बांगला देशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घालून मायदेशाची वाट धरली. मात्र, संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची बॅग या प्रवासादरम्यान गहाळ झाली आहे. त्यामुळे त्याने भारतात पाय ठेवताच एक ट्विट केले असून सध्या हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

झाले असे की, भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर सिराजला विमानतळावर त्याची बॅगच मिळाली नाही. ती गहाळ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याने ट्विट करून एअर विस्ताराला कळकळीची विनंती केली आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, कृपया मला माझी बॅग त्वरित मिळवून द्या आणि ती हैदराबादमध्ये पोहोचवा. कारण, त्यात माझ्या अनेक महत्त्वाच्या वस्तू आहेत. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी सिराजची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, टी-20 मालिकेसाठी त्याचा विचार करण्यात आलेला नाही.

संबंधित बातम्या
Back to top button