Reading Skills: मुलांचे वाचनकौशल्य सुधारण्यासाठी ‘या’ आहेत खास टिप्स

Reading Skills
Reading Skills

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान आत्मसाथ करायचे असल्यास वाचन हे महत्त्वाचे कौशल्य आहे. वाचन हे असे महत्त्वाचे कौशल्य आहे की, जे तुमच्या मुलांना (Reading Skills) अगदी कमी वयात एखाद्या विषयात मास्टर बनवू शकते. जशी मुले मोठे होतील तसे वाचन हे त्यांना त्याच्या अभ्यासात आणि एखादी गोष्ट समजून घ्यायला मदत करते.

वाचन प्रवाह म्हणजे स्पष्टपणे वाचण्याची क्षमता. मुले जेव्हा शाळेत प्रवेश करतात, तेव्हा वाचायला शिकतात. मात्र याचा अर्थ असा नाही की, त्यांचे हे कौशल्य परिपूर्ण आहे. मुल एखादी गोष्ट नवीन करायला शिकले तर त्याच्यावर सर्वात जास्त प्रभाव हा त्याच्या पालकांचा असतो. तुम्ही घरात जसे वातावरण तयार करता, ज्याप्रकारे त्यांच्याशी संवाद साधता त्याचा प्रभाव तुमच्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. तुम्ही जे शिकवता तेच मुलं आत्मसाद करतात. पालकांच्या प्रेम आणि काळजीशिवाय ही मुले शिकू शकणार नाहीत. हे लक्षात घेऊन या काही टिप्स (Reading Skills) वापरून तुम्ही देखील तुमच्या मुलाचे वाचनकौशल्य वाढवू शकता.

Reading Skills: मोठ्याने वाचा

मुलांना अस्खलित वाचता येण्यासाठी त्याने ते शब्द स्पष्टपणे ऐकले आणि समजून घेतले पाहिजेत. जर तुमचे शब्द ते स्पष्टपणे ऐकत असेल तर, ते सुद्धा याचे अनुकरण करतात. पालकांनी बोललेले शब्द जसेच्या जसे वापरण्याचा प्रयत्न करतात. ऐकलेल्या शब्दांचे उच्चारही ते वाचनात तो शब्द असल्यास ऐकलेल्या शब्दासारखाच करतात.

शब्दांचा मागोवा घ्या

कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी वेळ लागतो, विशेषत: ती भाषा असल्यास. मुलांना वेगवेगळ्या शब्दांचा उलगडा करणे कठीण जाऊ शकते, म्हणून वाचताना त्यांना शब्दांवर बोट ठेवायला सांगा. अशाप्रकारे बोट ठेवून वाचन केल्यास शब्दांचा मागोवा घेणे सोपे जाते.

पुन्हा पुन्हा वाचा

वाचनाची सुरूवात लहान पुस्तकाने करा. तुमच्या मुलाला ते फक्त नजरेने वाचायला सांगा. जर ते शक्य नसेल तर त्याला मोठ्याने आवाज करून वाचायला सांगा. एखादा उतारा समजण्यासाठी स्पष्टपणे तीन ते चारवेळेस तो वाचायला सांगा.

वाचताना शब्दसंग्रह तयार करा

तुमच्या पाल्याला त्याच्या/ तिच्या वयात परिचित असावे असे वाटणारे १० ते २० शब्द निवडा. अशा शब्दांचा सेट तयार करा, जे तुमचे पाल्याला वाचण्यास आणि लेखन करण्यास सोपे असावे. जर त्याला साधे शब्द कळले नाहीत, तर वाचतानाही अडचण निर्माण होऊ शकते.

एकत्रित वाचन करा

अवांतर वाचन करताना मुलांसोबत एकत्र बसून मोठ्याने वाचण्याचा सराव करून घ्या. तुमच्या मुलाला काय वाचायला आवडेल त्यानुसार वाचनाची निवड करा. त्याला हा वाचनाचा सराव निरस वाटू नये याची कटाक्षाने काळजी घ्या.

वाचनाची मजा घ्या

वाचन हे मुलांना बोअर करणारे सलग, सिरिअस नसावे. वाचन करताना मध्ये विनोद, मस्करी करत या वाचनाची मज्जा घ्यावी. त्यांना शब्द समजतील अशाप्रकारे वाचन करावे.

मुलांची स्तुती करा

मुलांसाठी आत्मजागरूकता ही खूप महत्त्वाची असते. त्यांची स्तुती केल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि त्यांना आणखी काम करण्यास प्रोत्साहन मिळते. म्हणून वाचनाच्या बाबतीतही मुलांच्या चुका सांगून त्यांचे कौतुक करावे, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news