Sandeep Lamichhane : आयपीएल खेळलेल्या ‘या’ खेळाडूचे करिअर बलात्काराच्या आरोपामुळे धोक्यात, म्हणाला ‘मी निर्दोष आहे’

Sandeep Lamichhane
Sandeep Lamichhane
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछानेला कधीही अटक होऊ शकते. आयपीएल खेळलेल्या या क्रिकेटपटूवर बलात्काराचा आरोप झाला आहे. या प्रकरणी लामिछाने यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) सहभागी झालेला लामिछाने लीग सोडून देशात परतत आहे. (Sandeep Lamichhane)

नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) सोडून देशात परतत आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे. आरोपानंतर नेपाळमधील जिल्हा न्यायालयाने लामिछानेविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर नेपाळ क्रिकेट बोर्डाने कर्णधार संदीप लामिछानेलाही निलंबित केले आहे. सध्या लामिछाने सीपीएलमध्ये जमैका तल्लावाह संघाकडून खेळत आहे. गेल्या वर्षी लामिछानेला नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. लामिछाने आयपीएलमध्ये 2018 आणि 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. बलात्काराच्या आरोपावर लामिछाने यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. (Sandeep Lamichhane)

बलात्काराच्या आरोपावर नेपाळचा कर्णधार संदीप लामिछाने म्हणाला, मी निर्दोष आहे. मी सीपीएलमधून सुट्टी घेऊन काही दिवसांत माझ्या देशात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी या सर्व बिनबुडाच्या आरोपांना सामोरे जाण्यास तयार आहे." संदीपवर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला अल्पवयीन मुलासह त्याच्या पालकाने संदीपविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. संदीपवर ऑगस्टमध्ये काठमांडू येथील हॉटेलच्या खोलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून काठमांडू पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.

संदीप लामिछाने यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

22 वर्षीय संदीप लामिछाने नेपाळसाठी 30 एकदिवसीय आणि 40 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 69 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये त्याच्या 78 विकेट्स आहेत.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले

संदीप लामिछानेने 2018 साली दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्यांचे वय 17 वर्षे 8 महिने होते. त्याला दोन हंगामात दिल्लीच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या लेगस्पिनरने 9 सामन्यात 13 विकेट घेतल्या. लामिछाने जगभरात T20 क्रिकेट खेळतो. त्याने 136 टी-20 सामन्यात 193 विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news