कामावेळी छोटासा ब्रेक घेणे ठरते लाभदायक

कामावेळी छोटासा ब्रेक घेणे ठरते लाभदायक
Published on: 
Updated on: 

न्यूयॉर्क : माणसाचे शरीर म्हणजे यंत्र नव्हे. कामाच्या रहाटगाडग्यात त्यालाही विश्रांतीची आवश्यकता भासत असते. अगदी दहा मिनिटांच्या विश्रांतीनेही शरीर व मन ताजेतवाने होऊन नवी ऊर्जा मिळते असे संशोधकांनी आता म्हटले आहे. याबाबतची माहिती 'पीएलओएस वन' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार कामाच्या दरम्यान स्वतःला फ्रेश आणि ऊर्जायुक्‍त ठेवायचे असेल तर मध्ये मध्ये दहा मिनिटांची विश्रांती घेणे लाभदायक ठरते.

एका पाहणीत असे दिसून आले की जे लोक कामाच्या दरम्यान असा छोटा 'ब्रेक' घेतात ते अधिक उत्साही व ऊर्जावान राहतात. त्यांना कमी थकवा जाणवतो. टोरांटो विद्यापीठातील ऑर्गनायझेशनल बिहेवियर आणि ब्रेक एक्सपर्टचे प्राध्यापक जॉन पी. ट्राउगाकोस यांनी सांगितले की बैठे काम करणार्‍या लोकांनी कामाच्या दरम्यान थोडासा ब्रेक घेतला तर त्याचा त्यांच्या कामावर बराचसा सकारात्मक परिणाम होतो. अशा 'मायक्रो ब्रेक्स'मुळे थकवा कमी होतो.

दर वीस ते तीस मिनिटांनी डोळ्यांना आराम दिल्याने तसे डोळे थोडे ताणवल्याने डोळ्यांवरील अतिरिक्‍त दबाव कमी होतो. प्रॉडक्टिव्हिटी ट्रॅकर कंपनीच्या संशोधनानुसार 52 मिनिटांच्या कामानंतर 17 मिनिटांचा ब्रेक आवश्यक आहे. 90 मिनिटांच्या कामानंतर 15 ते 20 मिनिटांचा ब्रेक घेणे आवश्यक आहे. तुम्ही कोणते काम करीत आहात यावरही ब्रेक अवलंबून असतात. नावडत्या किंवा तणावपूर्ण कामाच्या तुलनेत काम आनंददायी असेल तर थकवा कमी जाणवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news