नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा बुधवारी (दि.५) दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला, यावेळी रवीना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यादरम्यान एक व्हिडिओही समोर आला आहे. (Raveena Tandon Padma Shri Award)
न्यूज एजन्सी एएनआयने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिनेत्री रवीना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करताना दिसत आहेत. रवीना टंडन या साडी परिधान करून पारंपरिक लूकमध्ये पुरस्कार घेण्यास पोहोचल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान आणि सेवाभावी कार्यासाठी या गुणी अभिनेत्रीचे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. (Raveena Tandon Padma Shri Award)
रवीना टंडन गेल्या तीन दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे आणि तिने आतापर्यंत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रवीनाचे 'मोहरा', 'दिलवाले', 'अंदाज अपना अपना' सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. तिचे 'सत्ता' आणि 'दमन' सारख्या चित्रपटांना समीक्षकांनी सुद्धा दाद दिली होती.
'रवीना टंडन फाऊंडेशन'द्वारे सामाजिक कार्यात योगदान
चित्रपटांसोबतच ही अभिनेत्री सामाजिक कार्यातही सक्रीय आहे. बालहक्क, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण यासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये ती तिचा सक्रिय सहभाग नोंदवत आहे. त्या 'रवीना टंडन फाऊंडेशन'च्याही संस्थापक आहेत, जे वंचित मुलांना शिक्षण आणि आरोग्य सेवा देण्यासाठी काम करते.
'घुडछडी' या आगामी चित्रपटात कॉमेडी करताना दिसणार
सध्या रवीनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रवीना टंडनने २०२१ मध्ये अरण्यक या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय ती यशच्या KGF Chapter 2 या चित्रपटात दिसली होती. आता रवीना टंडन लवकरच 'घुडछडी' या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
अधिक वाचा :