IBPS Topper : जतच्या तरुणाचे आयबीपीएस परीक्षेत मोठे यश; करजगी येथील सदाशिव मेडीदार भारतात पहिला | पुढारी

IBPS Topper : जतच्या तरुणाचे आयबीपीएस परीक्षेत मोठे यश; करजगी येथील सदाशिव मेडीदार भारतात पहिला

जत; पुढारी वृत्तसेवा : दुष्काळाच्या शिक्का असलेल्या करजगी (ता.जत) येथील सदाशिव शिवशंकर मेडीदार या तरुणांने परिस्थितीची जाण व भवितव्याचे भान राखत नुकत्याच झालेल्या आयबीपीएस परीक्षेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे भारतात प्रथम क्रमांक मिळवून आपले स्थान अधोरेखित केले आहे. बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाची परीक्षा रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखाली घेतली जाते त्यामुळे या परीक्षेस विशेष असे महत्त्व आहे. (IBPS Topper)

जत तालुकयाची सर्व क्षेत्रात प्रगती दिसून येत आहे. मात्र लोकसेवा आयोग व स्पर्धा परीक्षा अपवाद होत्या. गतवर्षी झालेल्या निकालात 2019 च्या झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत सहा तरुणांनी यश खेचून आणले होते. मेडीदार यांने नुकत्याच झालेल्या परीक्षेत इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (बँकिंग कर्मचारी निवड संस्था) आयबीपीएस एग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर या पदावर निवड झाली . विशेष म्हणजे सदाशिवला भारतातील टॉपर बनण्याचा मान देखील मिळाला आहे.

घरी बसून केला ऑनलाईन अभ्यास

सदाशिवने राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेत 76.27% गुण मिळवत राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्येच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. सदाशिवचे माध्यमिक शिक्षण करजगीच्या परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांने महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व जुनिअर कॉलेज उमदी येथे शिक्षण घेतले. त्यानंतर कृषी पदविकेचे शिक्षण लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय हिंगणगाव कडेगाव येथे पूर्ण केले सदाशिवला उमदी समतानगर येथील हणमंत शिवाप्पा लोणी यांचे चांगले मार्गदर्शन लाभले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सदाशिवने घरी बसूनच ऑनलाइनच्या मदतीने अभ्यास केला व घवघवीत यश मिळवले खरंच या त्याच्या प्रयत्नाला व कष्टाला खऱ्या अर्थाने यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून व्यक्त होत आहे वैभव लोणी, राजू लोणी, डॉ विनायक लोणी ,सुरेखा लोणी यांनी उमदी येथे सत्कार केला आहे . सदाशिवचे अभिनंदन जत तालुका बार असोसिएशनचे सचिव ॲड. सागर व्हनमाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. IBPS ही स्वायत्त राष्ट्रीय संस्था आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे PBI (Public Sector Banks ) आणि RBI (Reserved Bank Of India) साठी भरती परीक्षा घेते. PBI मधील SBI बँक वगळता सर्व बँकांमधील कर्मचाऱ्याची भरती ही IBPS ने घेतलेल्या परीक्षेतून होते. IBPS परीक्षेतून बँकेतील सर्व श्रेणीतील अधिकारी यांची निवड करते.

हेही वाचा

Back to top button