गहराईया Review : कंगना म्हणाली असला कचरा विकू नका; आता रश्मिका मंदाना काय म्हणाली ?

गहराईया Review : कंगना म्हणाली असला कचरा विकू नका; आता रश्मिका मंदाना काय म्हणाली ?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या गहराईया चित्रपटाची मोठी चर्चा सुरु आहे. रोमँटिक -ड्रामा 'गहराईयां' मध्ये अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धर्या करवासहित अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही प्रेक्षकांनी दीपिका पादुकोणचा 'गहराइयां' शानदार असल्याचं म्हटलं जात आहे. तर काहींना हा चित्रपट आवडला नसल्याची प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, पुष्पा फेम साऊथ इंडस्ट्री ची प्रसिध्द अभिनेत्री रश्मिका मंदानाने देखील गहराइयां पाहून रिव्ह्यू जारी केला आहे.

रश्मिका मंदानाने इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिलंय- 'या चित्रपटासाठी बिग शाउट. 'गहराइयां'में दीपिका पादुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धर्या करवा तुम्ही स्टनिंग दिसत होता. खास म्हणजे, रिलेशनशीपमधील वास्तविकता आणि वेगळा विषय शकून बत्रा यांनी आणला आहे. तुम्हा सर्वांना पुन्हा शुभेच्छा'.

गहराइयांची कहाणी नाते, प्रेम, मैत्री आणि विश्वासघात, धोका या अवतीभोवती फिरते. ही चार लोक अलीशा (दीपिका), टिया (अनन्या) जैन आणि करण (धैर्या) यांच्या आयुष्याभोवती फिरते. हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर ११ फेब्रुवारी रोजी रिलीज झाला होता.

रश्मिका मंदानाकडे अनेक बॉलीवूड प्रोजेक्ट्स आहेत. ती स्पाय थ्रिलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा सोबत दिसेल. शांतनु बागची दिगेदर्शित चित्रपट 'मिशन मजनू' मध्येही दिसेल. याशिवाय, 'गुडबाय' मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चनसोबत दिसेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news