पुणे : यावर्षीचे बाजरीचे पीक उत्तम; श्री क्षेत्र वीर येथील यात्रेत भाकणूक | पुढारी

पुणे : यावर्षीचे बाजरीचे पीक उत्तम; श्री क्षेत्र वीर येथील यात्रेत भाकणूक

परिंचे : पुढारी वृत्तसेवा

या वर्षी मृगाचे पाणी चार खंडांत पडेल, हत्तीचे पाणी तीन खंडांत पडेल, आश्लेषा तसेच मघा नक्षत्र दोन खंडांत पडेल. जनतेचे समाधान होईल, बाजरीचे पीक चांगले येईल. गाई-गुरे, शेळी-मेंढी यांच्यामागे रोगराई नसून, मनुष्यामागे साधारण रोगराई राहील, अशी भाकणूक देवाचे श्रीनाथ म्हस्कोबा मानकरी श्री. तात्यासो बुरुंगले यांनी सोमवारी (दि. २१) ठीक दुपारी २.२७ वाजता केले. श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे हा भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला.

नारायण राणेंच्या बंगल्यात पालिका पथक दाखल; जुहू तारा रोडवर पोलीस बंदोबस्त

कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा जिल्हाधिकारी यांच्या आदेशप्रमाणे रद्द करण्यात आली आहे. फक्त ठराविक मानकरी, सालकरी, दागीनदार व पालख्या यांच्या उपस्थितीत देवळातील धार्मिक विधी करण्यात आले. शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करीत हे धार्मिक विधी करण्यात येत आहेत.

Fifth fodder scam case : चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा, ६० लाखांचा दंड

सोमवारी (दि. २१) पंचमीस पहाटे ४ वाजता देवाची पूजा करून मानकऱ्यांमार्फत देवाला पोशाख करण्यात आला. दुपारी १. ३० वाजता सर्व काठ्या तसेच पालख्या देऊळवाड्यात आल्या. आरती होऊन छबिन्याला सुरुवात झाली. एक मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर दुपारी २.२७ मिनिटांनी देवाचे मानकरी श्री. तात्यासो बुरुंगले यांनी वार्षिक पीकपाणी भविष्यवाणी (भाकणूक) केली. त्यानंतर सर्व पालख्यांसोबत दोन प्रदक्षिणा होऊन काठ्या तसेच पालख्या आपापल्या पालखीतळावर मार्गस्थ झाल्या.

Praggnanandhaa vs Magnus carlsen : १६ वर्षीय प्रज्ञानंदच्या चालीसमोर अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन चितपट!

ठराविक प्रवेशपात्र मानकरी, सालकरी, दागीनदार व प्रमुख पालख्या यांच्या उपस्थितीत शासनाचे सर्व नियम पालन करून मंदिरातील विधी करण्यात आले आहेत. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष प्रल्हाद धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, विश्वस्थ हनुमंत (बाबूकाका) धुमाळ, अभिजित धुमाळ, अमोल धुमाळ, नामदेव जाधव, शिवाजी कदम, संजय कापरे, राजेंद्र कुरपड, सल्लागार रामचंद्र धुमाळ, माधव धुमाळ, तानाजी धुमाळ, शंकर धुमाळ, विशाल धुमाळ आदी उपस्थित होते.

Back to top button