मणिपूर अत्‍याचारप्रकरणी गदाराेळ, ‘आप’ खा. संजय सिंह राज्‍यसभेतून निलंबित

मणिपूर अत्‍याचारप्रकरणी गदाराेळ,  ‘आप’ खा. संजय सिंह राज्‍यसभेतून निलंबित
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह ( AAP MP Sanjay Singh ) यांच्‍यावर राज्‍यसभा सभापतींनी आज ( दि. २४) निलंबनाची कारवाई केली.

आज सभागृहाचे कामकाज सुरु झाल्‍यानंतर मणिपूर हिंसाचार व अत्‍याचार प्रकरणी विरोधी पक्षाचे सदस्‍य आक्रमक झाले. सरकार चर्चेसाठी तयार आहे, तरीही कारवाईत अडथळा आणला जात आहे, असे यावेळी खासदार पियुष गोयल यांनी सांगितले.
वारंवार नकार देऊनही संजय सिंह यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचे राज्यसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे त्याला संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. पीयूष गोयल यांच्या तक्रारीवरून राज्यसभा सभापतींनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे आता संजय सिंह यांना संपूर्ण अधिवेशनात राज्यसभेत प्रवेश करता येणार नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news