Rajkummar Rao : आली लग्नघटीका समीप, राजकुमार राव अडकणार विवाहबंधनात

Rajkummar Rao : आली लग्नघटीका समीप, राजकुमार राव अडकणार विवाहबंधनात
Published on
Updated on

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव ( Rajkummar Rao) लवकरचं विवाहबंधनात अडकणार आहेत. याची चर्चा इंडस्ट्रीमध्ये सूरू आहे. अलिकडेचं अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल, रणबीर कपूर आणि अलिया भट लवकरचं बोहल्यावर चढणार याची जोरदार चर्चा सूरू असतानाचं राजकुमार रावही आपली मैत्रिण पत्रलेखा मिश्रा पॉलशी विवाह करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

Rajkummar Rao राजकुमार आणि पत्रलेखा (Patralekhaa) बरेचं वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांनी अधिकृतरित्या विवाहाची तारिख जाहिर केलेली नाही. पण यांच्या विवाहाची जाेरदार चर्चा त्यांच्या कुटुंबीयांना आणि दोघांच्या मित्रांमध्ये सुरू आहे. दोघे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विवाह करण्याची शक्यता वर्तवली आहे. राजकुमार आणि पत्रलेखा यांचे चाहते विवाहाच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सिटी लाईटस्  चित्रपटादरम्यान ओळख
सिटी लाईटस् या चित्रपटावेळी राजकुमार आणि पत्रलेखा यांची ओळख झाली. या चित्रपटात दोघांचीही मुख्य भूमिका केली होती. तेव्हापासून त्यांच्यातील मैत्रभाव वाढला. ते अलिकडे ते लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत आहेत. दोघांनीही आपलं नातं लपवलेलं नाही. ते दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

 कोण आहे पत्रलेखा 

शिलॉंग मध्ये जन्मलेल्या पत्रलेखा मिश्रा पॉलने सिटी लाईटस् चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला अभिनयाची आवड लहानपणापासूनचं होती. तिने अनेक व्यावसायिक जाहिरांतीसाठी काम केले आहे. पत्रलेखाला अभिनयाबरोबरचं नृत्याची आणि खेळाची आवड आहे. 

 मेड फॉर इच अदर 

राजकुमार (Rajkummar Rao)आणि पत्रलेखा (Patralekhaa) या दोघांच्या रिलेशनची चर्चा बॉलिवूडमध्ये नेहमी रंगत असते. दोघांनीही आपलं नातं लपवलेलं नाही. बॉलिवूडमध्ये या दोघांच्याकडे 'मेड फॉर इच अदर' कपल म्हणून पाहिले जाते. राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या चाहत्यांना विवाहाच्या तारखेची आतुरता लागली आहे.  
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news