बॉयफ्रेंड म्हणाला, ग्रुपवर सेक्स चॅट व्हायरल करू का ? घाबरलेल्या गर्लफ्रेंडने एका क्षणात... | पुढारी

बॉयफ्रेंड म्हणाला, ग्रुपवर सेक्स चॅट व्हायरल करू का ? घाबरलेल्या गर्लफ्रेंडने एका क्षणात...

गांधीनगर; पुढारी ऑनलाईन

बॉयफ्रेंडकडून किंवा गर्लफ्रेंडकडून एखादा तडकाफडकी निर्णय घेऊन एका क्षणात होत्याचे नव्हते झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. आता यामध्ये आणखी भर टाकणारी घटना गुजरातमधील गांधीनगरमध्ये घडली आहे. बॉयफ्रेंडने ब्लॅकमेल करून सेक्स चॅट व्हायरल करण्याची धमकी दिल्यानंतर भयभित झालेल्या गर्लफ्रेंडने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. मुलीने आत्महत्या केल्यानंतर वडिलांनी पोलिसांकडे त्या बॉयफ्रेंडविरोधात तक्रार दाखल केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार गांधीनगर जिल्ह्यातील नरदीपूर येथील गावातील रुशी पटेल तरुणासोबत आत्महत्या केलेल्या तरुणीसोबत होते. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी अनेकवेळा सेक्स चॅट केले होते. काही कालावधीनंतर त्या दोघांमध्ये वितुष्ट येऊन नात्यामध्ये दरी आली.

मृत झालेल्या २३ वर्षीय तरुणीने गांधीनगरमधील महाविद्यालयातून गेल्यावर्षी पदवी घेतली होती. भाचीच्या उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या तिच्या वडिलांना त्यांच्या मुलाकडून तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी घरी धाव घेतली. घरी पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीचा मृतदेह शेजाऱ्यांनी घेरलेला दिसला.

तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तिच्या मृत्यूची नोंद पोलिसांत झाली नाही. कारण तिच्या वडिलांना सामाजिक कलंकाची भीती होती. गेल्या मंगळवारी तिच्या वडिलांनी तिची डायरी, मोबाईल फोन आणि बॅग या सर्व सामानाची तपासणी केली असता मुलीच्या टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण उघड झाले.

गांधीनगरमधील नरदीपूर गावातील रहिवासी रुशी पटेल आपल्या मित्राच्या ग्रुपमध्ये सेक्स चॅट पोस्ट करण्याची धमकी देत ​​असल्याचे पीडित तरुणीने आपल्या डायरीत लिहिले होते. त्याने तरुणीशी नाते तोडले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मात्र त्याला अजूनही तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचे होते.

तरुणीने तिच्या डायरीमध्ये रुशी पटेल आत्महत्या करण्याची धमकी देत ​​होता आणि हे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका तिच्यावर ठेवणार होता. यामुळे मी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे लिहून ठेवले होते. तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत वरील माहिती दिली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button