INDvsNZ : शार्दूल-ईशानचा कपल डान्स, रोहित-कोहलीच्या फॅमिलीचं हम साथ-साथ है.. | पुढारी

INDvsNZ : शार्दूल-ईशानचा कपल डान्स, रोहित-कोहलीच्या फॅमिलीचं हम साथ-साथ है..

दुबई : पुढारी ऑनलाईन

टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज हाय व्होल्टेज सामना आहे. टीम इंडिया न्यूझीलंड संघाला भीडणार आहे (INDvsNZ). टीम इंडियाचा हा दुसरा सामना आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानने मात दिली होती. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विराट कोहलीच्या संघाला आजचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. हा हाय व्होल्टेज सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाईल. यापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची पत्नी प्रीती हिने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शार्दुल ठाकूर आणि ईशान किशन कपल डान्स करताना दिसत आहेत. त्याचवेळी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या हे पाहून खळखळून हसताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये संघातील खेळाडूंचे कुटुंबियही दिसत आहेत. रोहित शर्माची मुलगी समायरा, विराट कोहलीची मुलगी वामिका, आर. अश्विनची मुलगी आध्या आणि अकिरा यांच्यासह हार्दिक पंड्याचा मुलगा अगस्त्य यांनीही पार्टीत मजामस्ती केली. लहानग्यांच्या याच पार्टीत इशान किशन आणि शार्दुल ठाकुर यांनी कपल डान्स केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकानेही त्यांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

भारत आणि न्यूझीलंड सुपर-12 च्या ग्रुप-2 मध्ये आहेत. या गटात पाकिस्तानचा संघ सलग तीन सामने जिंकून 6 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान संघ 2 सामन्यांत 1 विजय आणि 1 पराभवासह 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. नामिबिया 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड, भारत आणि स्कॉटलंडने आपले खाते उघडलेले नाही. चांगल्या नेट रनरेटच्या आधारे न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. भारत पाचव्या तर स्कॉटलंड सहाव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना जिंकून टीम इंडियाला प्रत्येक परिस्थिती जिंकून 2 गुण मिळवायचे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh)

Back to top button