राजस्थान मंत्रिमंडळाचा विस्तार : पायलट गटातील पाच जण घेणार मंत्रीपदाची शपथ

 राजस्थान मंत्रिमंडळाचा विस्तार : पायलट गटातील पाच जण घेणार मंत्रीपदाची शपथ

राजस्थान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून १५ मंत्र्यांची नावे मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केली आहेत. अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले असले तरी आज जुने १५ आणि नव्या १५ मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.  राजस्थान मंत्रिमंडळामध्‍ये  सचिन पालयट यांच्या गटाला पाच जागा दिल्या आहेत. मुरारीलाल मीणा, बृजेंद्र सिंह ओला, हेमाराम चौधरी, रमेश मीणा और विश्वेंद्र सिंह हे पायलट गटाचे मानले जातात.

राजस्थान मंत्रिमंडळाचा विस्तार : पायलट गटातील पाच जण घेणार मंत्रीपदाची शपथ

सीएमओ कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार हेमाराम चौधरी, महेंद्रजीत मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा, ममता भूपेश, भजनलाल जाटव, टीकाराम जूली, गोविंद राम मेघवाल व शकुंतला रावत यांना कॅबिनेट तर जाहिदा खान, बृजेंद्र सिंह ओला, राजेंद्र गुढ़ा व मुरारीलाल मीणा यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समाविष्ट केले आहे.

नव्या मंत्रिमंडळातील तीन मंत्री अनुसूचित जातीचे असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली आहे. भजनलाल जाटव, ममता भूपेश भैरवा और टीकाराम जूली यांना कॅबिनेट मंत्री केले आहे.

सचिन पायलट यांच्या गटातील विश्वेद्र सिंग, रमेश मीणा, हेमाराम चौधरी यांना कॅबिनेट तर बृजेंद्र ओला और मुरारी मीणा यांना राज्यमंत्री म्हणून सत्तेत सहभागी करून घेतले आहे. हेमाराम चौधरी, मुरारीलाल मीणा व बृजेंद्र ओला को पूर्व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या जवळचे मानले जातात. मागील वर्षी गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आले होते. बहुजन समाज पार्टीतून काँग्रेसमध्ये आलेल्या सहा आमदारांपैकी राजेंद्र गुढा यांना मंत्री केले आहे.

राजस्थान मंत्रिमंडळ शपथ  : ३० मंत्र्यांचा कोटा

गेहलोत मंत्रिमंडळात ३० मंत्र्यांचा कोटा असून तो विस्ताराने तो पूर्ण होणार आहे. जुने १५ आणि नवे १५ मंत्री आज शपथ घेणार आहेत. १५ आमदारांना संसदीय सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती दिली आहे. या मंत्रिमंडळात एकाही अपक्ष आमदाराला स्थान दिलेले नाही. मात्र, त्यापैकी काहींना सल्लागार म्हणून स्थान दिले आहे. राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग डोटासरा यांनी राजीनामा दिल्यानंतर अन्य मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजभवनात राज्यपाल कलराज मिश्र यांच्याशी चर्चा केला हाेती.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news