Sena v/s Rayat Kranti : इस्लामपूरमध्ये शिवसैनिक-रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची | पुढारी

Sena v/s Rayat Kranti : इस्लामपूरमध्ये शिवसैनिक-रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेच्या पुढाकाराने इस्लामपूर बस आगारातून बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. आगारात शिवसेनेचे कार्यकर्ते ठाण मांडून आहेत. शनिवारी दुपारी आंदोलन करण्यासाठी गेलेल्या रयत क्रांती संघटनेच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी वेळीच धाव घेत माजी मंत्री आ.सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांच्यासह दहा- पंधरा कार्यकर्त्यांना दोघा शिवसैनिकांना ताब्यात घेतले. (Sena v/s Rayat Kranti)

शनिवारी सकाळी इस्लामपूर आगाराची बस प्रवासी घेवून पोलीस बंदोबस्तात ताकारीला गेली होती. ताकारी बसस्थानकावर प्रवासी उतरल्यानंतर बस पुन्हा इस्लामपूरला जाण्यासाठी स्थानकावर उभी असताना अचानक अज्ञातांनी बसवर पाठीमागून दगडफेक केली. यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दगडफेकी प्रकरणी रयतक्रांती संघटनेचा कार्यकर्ता नंदकुमार शंकर पाटोळे (रा. भवानीनगर ता. वाळवा ) याला अटक केली. (Sena v/s Rayat Kranti)

त्यानंतर दुपारी रयत क्रांती संघटनेचे सागर खोत हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह इस्लामपूर बस आगराच्या परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बसस्थानकात असलेल्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर शिवसैनिक आणि रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यात बाचाबाची झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही शिवसैनिक हातात दगड घेऊन आंदोलनस्थळी आले असल्याचा आरोप, रयत क्रांती संघनेच्या कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी धाव घेत सागर खोत यांच्यासह रयत क्रांतीच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांना तसेच दोघा शिवसैनिकाना ताब्यात घेतले. (Sena v/s Rayat Kranti)

हे ही वाचा :

Back to top button