Seema Khan : मलायकापेक्षाही ग्लॅमरस आहे सलमानची दुसरी वहिनी | पुढारी

Seema Khan : मलायकापेक्षाही ग्लॅमरस आहे सलमानची दुसरी वहिनी

पुढारी ऑनलाईन :

बॉलिवूडमध्ये खान फॅमिली नेहमी चर्चेत असते. विशेष म्हणजे, दबंग सलमान खान आणि त्याची आधीची वहिनी (अरबाज खानची एक्स पत्नी) मलायका. तिच्यामुळे नेहमीच खान फॅमिली चर्चेत राहिलीय. पण, सलमानच्या धाकट्या वहिनीबद्दल फारसे कुणाला ठाऊक नसेल. सलमानची धाकटी वहिनी सीमा खान (Seema Khan) ही फारशी लाईमलाईटमध्ये नसते. सीमा खान (Seema Khan) ही सलमानचा छोटा भाऊ सोहेल खानची पत्नी आहे. तसं पाहिलं तर खरंतरं सोहेलचं वैयक्तिक आयुष्य फारसं प्रसिद्धीझोतात अधिक आलेलं नाही.

सलमान खानची धाकटी वहिनी सीमा ही एक बिझनेस वूमन आहे. तिने तिच्या व्यवसायात आपले बस्तान बसवले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सीमा खान एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. याशिवाय सीमाचे ‘बांद्रा 190’ नावाचे बुटीक आहे. ती ‘कलिस्टा’ नावाचा ब्युटी स्पा आणि सलूनही चालवते.

मलायका अरोराला देते मात

आतार्यंत ही खान कुटुंबीयातील मलायकाच्या फिटनेस आणि सौंदर्याची चर्चा व्हायची. पण, फार कमी लोकांना माहिती असेल की, सोहेलची पत्नी सीमा हिने फिटनेसबाबतीत आणि सौंदर्य बाबतीत मलायकालाही मात दिलीय.

सीमा दिसायला खूप सुंदर आहे. सोहेल आणि सीमा १९९८ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत. एकाचे नाव निर्वाण खान तर एकाचे नाव अस्लम खान होय. सोहेलने आधी आर्य समाज मंदिरात हिंदू विधीनुसार सात फेरे घेऊन लग्न केले होते, नंतर मुस्लिम धर्मानुसार लग्न केले होते.

सोहेलने चित्रपट निर्मातादेखील आहे. त्याने काही टीव्ही रिॲलिटी शोमध्येदेखील जज म्हणून काम पाहिले आहे. सोहेल खानने आपल्या चित्रपट करियरमध्ये १९९७ मध्ये दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्याचा पहिला चित्रपट होता- ‘प्यार किया तो डरना क्या’. या चित्रपटावेळी सोहेल आणि सीमाची भेट झाली. सीमा दिल्लीची राहणारी आहे.

टीव्ही मालिका ‘जस्सी जैसी कोई नहीं’ मध्ये कलाकारांचे कपडे सीमाने डिझाईन केले होते.

सीमाची लव्हस्टोरी अशीही

फॅशन डिझाईनमध्ये करियर करण्यासाठी ती मुंबईला आली होती. येथे सीमा-सोहेल यांची पहिली भेट झाली. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं. दोघांना लग्न करायचं होतं. पण, सीमाचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते.

कुटुंबीयांच्या नकारानंतर सीमाचं प्रेम कमी झालं नाही. दोघांनी पळून जाऊन केलं. ज्या दिवशी सोहेलचा पहिला चित्रपट ‘प्यार किया तो डरना क्या’ रिलीज झाला होता. त्यावेळी सोहेल आणि सीमा घरातून पळून गेले होते. लग्नानंतर सोहेलने सीमासोबत मिळून एंटरटेनमेंट बिझनेस सुरू केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Seema Khan (@seemakhan76)

 

View this post on Instagram

 

A post shared by Seema Khan (@seemakhan76)

 

View this post on Instagram

 

A post shared by Seema Khan (@seemakhan76)

 

View this post on Instagram

 

A post shared by Seema Khan (@seemakhan76)

 

View this post on Instagram

 

A post shared by Seema Khan (@seemakhan76)

Back to top button