#Rain Update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती, आंध्रप्रदेश किनारपट्टीवर धडकणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गेल्या तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे दक्षिण भारतात प्रचंड पाऊस (Rain Update) सुरू आहे. एक डिसेंबर रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्यास सुरुवात झाली आहे. २ डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. ४ रोजी हे वादळ आंध्रप्रदेश किनारपट्टीवर धडकणार आहे. (Rain Update)

एक डिसेंबर रोजी दुपारी हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या ताज्या बुलेटिननुसार, दक्षिण थायलंड ते अंदमानच्या समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. २ डिसेंबर रोजी सकाळी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. ते आंध्र प्रदेश आनंद किनारपट्टीवर ४ डिसेंबर रोजी सकाळी धडकण्याची शक्यता आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला आहे. हा संपूर्ण परिसर ढगांनी वेढला आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन व हलका ते मुसळधार पाऊस देशातील ३० पेक्षा जास्त राज्यात राहील. महाराष्ट्रातही कोकण मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात किमान १७ जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणखी ३ दिवस राहील.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आगामी २४ तासात मध्यम स्वरूपाचे राहील. पुढील ४८ तासांत ते अधिक तीव्र होऊन ४ डिसेंबरपर्यंत देशभर पाऊस राहील. अरबी समुद्रातही वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने कोकण ते गुजरात किनारपट्टीपर्यंत ढगांची प्रचंड गर्दी असून वाऱ्याचा वेग ही वाढल्याने सर्वत्र दाट धुके व हलका पाऊस राहील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news