Shalmali Kholgade wedding : शाल्मलीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकले लग्न | पुढारी

Shalmali Kholgade wedding : शाल्मलीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकले लग्न

मुंबई; पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade wedding ) हिने गुपचूप पद्धतीने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत विवाह बंधनात अडकली. शाल्मलीचा नुकताच गेल्या २२ नोव्हेंबर २०२१ रोजी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. सध्या या विवाह सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकतेच शाल्मली खोलगडे हिच्या इन्स्टाग्रामवर विवाह सोहळ्याचे (Shalmali Kholgade wedding ) काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत शाल्मलीने ऑरेंज आणि पांढऱ्या रंगाची साडी, कानात झुमके आणि केसांत गजरा माजलेला दिसत आहेत. यातील एका फोंटोत शाल्मली आणि फरहान दिसत आहेत.

या विवाह सोहळ्यात खास करून दोघांच्या गळ्यातील वरमाळांनी चाहत्याचे लक्ष वेधले. ही वरमाळ कागदी फुले आणि दोघांच्या फोटोंपासून तयार करण्यात आली होती.

या फोटोंच्या कॅप्शममध्ये शाल्मलीने लिहिले आहे की, ‘२२ नोव्हेंबर २०२१ हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहे. या माझ्या प्रिय व्यक्तीसोबत माझे लग्न झाले. आमचा विवाह सोहळा आमच्या घरातील लिव्हींग रूममध्ये झाला. या सोहळ्याला आमचे काही मोजके नातेवाईक उपस्थित होते.’

शाल्मली आणि फरहान शेख जवळपास ५ ते ६ वर्षांपासून एकमेंकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. यानंतर आज त्यांनी सर्व मित्रांसाठी एका रिसेप्शन पार्टीचे आयोजित केले आहे. यानिमित्ताने दोघांनी काही लग्नाचे फोटो शेअर केले आहे.

हे फोटो सोशल माडियावर व्हायरल होताच चाहत्यांकडून वेगवेगळ्या आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काही युजर्संनी दोघांच्या पुढील आयुष्यासाठी आणि लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय दुसऱ्या एका युजर्सने गुपचूप लग्न केल्याने शाल्मलीला ट्रोल केले आहे.

शाल्मलीने गायलेल्या ‘दारू देसी’, ‘परेशान’, ‘बालम पिचकारी’ या गाण्यानी प्रेक्षकांना भारावून सोडले होते. याशिवाय तिने ‘सूर नवा ध्यास नवा’ आणि ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ या शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पडाली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button