पुढारी ऑनलाईन डेस्क :
टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर आर अश्विन याला कोरोनाची लागण झाली आहे. ( R Ashwin covid test positive ) इंग्लंड विरुद्ध होणार्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. अश्विन सध्या विलगीकरणात आहे, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच अश्विन इंग्लंडला रवाना होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अश्विन हा भारतीय संघाबरोबर इंग्लंडला रवाना झालेला नाही. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या तो गृह विलगीकरणात आहे. इंग्लंडमध्ये १ जुलैपासून कसोटी सामना होणार आहे. त्यामुळे त्याची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तो लंडनला रवाना होईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अश्विन हा इंग्लंडमध्ये होणार्या सराव सामन्यालाही मुकणार आहे. २४ जूनपासून टीम इंडियाचा सराव सामना होणार आहे. हा सराव सामना चार दिवसांचा आहे.
हेही वाचा :