SL vs AUS : अंपायरिंग करत असतानाचं ‘फिल्डर’ बनले कुमार धर्मसेना (Video) | पुढारी

SL vs AUS : अंपायरिंग करत असतानाचं 'फिल्डर' बनले कुमार धर्मसेना (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका यांच्यामध्ये पाच सामन्यांची मालिका श्रीलंकेत सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर २९१ धावांचे आव्हान दिले होते. श्रीलंकेने ९ चेंडू शिल्लक ठेऊन ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. पथुम निसांकाने केलेल्या शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने हा सामन्यात दमदार विजय मिळवला. श्रीलंकेने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

फिल्डर बनले कुमार धर्मसेना (SL vs AUS)

कुमार धर्मसेना यांच्यावर या सामन्याच्या अंपायरिंगची जबाबदारी होती. ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना ३६ व्या षटकात लेक्स कैरी आणि ट्रायव्हस हेड फलंदाजी करत होते. ३६ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एलेक्स केरीने चेंडू स्क्वेअर लेगकडे फटकावला असता कुमार धर्मसेना यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आपल्या जागेवरून हटले नाहीत आणि चेंडू त्यांच्या डाव्या बाजूने पुढे गेला. कुमार धर्मसेना यांचा क्षेत्ररक्षण करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (SL vs AUS)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून फोटो शेअर (SL vs AUS)

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपल्या सोशल मीडीयावर कुमार धर्मसेना यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटो शेअर करताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, कुमार धर्मसेना यांना अॅक्शन मोडमध्ये यावे, असे वाटत होते. धर्मसेना यांचा हा फोटो सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सोशल मीडीयावर कुमार धर्मसेना यांना अनेकांकडून ट्रोल करण्यात येत आहे. (SL vs AUS)

विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते धर्मसेना (SL vs AUS)

कुमार धर्मसेना श्रीलंकेचे माजी फिरकीपटू आहेत. १९९६ मध्ये श्रीलंकेने विश्वचषक आपल्या नावावर केला होता, धर्मसेना या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. ११ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये धर्मसेना यांनी ३१ कसोटी सामने आणि १४१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये धर्मसेना यांच्या नावावर ६९ विकेट्स आहेत. तर त्यानी कसोटी क्रिकेटमध्ये ४ अर्धशतकही झळकावले होते. (SL vs AUS)

हेही वाचंलत का?

Back to top button