पुढारी ऑनलाईन : मानाच्या गणपतींचे लवकर प्रस्थान, लवकर मिरवणुका सुरू करण्याची घाई आणि इतर काटेकोर नियोजन करूनही पुणेरी बाप्पा विसर्जन मार्गातच खोळंबले आहेत. विसर्जन मिरवणुका वेळेत आटोपण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या दगडूशेठचे नऊ वाजण्याच्या आत विसर्जन देखील झाले.
पण त्यानंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, यांसारख्या मोठ्या मंडळांची मिरवणूक वेळेत सुरू होऊच शकली नाही. कारण दगडूशेठ बाप्पाचे विसर्जन होताच इतर मंडळांना विसर्जन मार्ग खुला करून देण्यात आला. त्यामुळे या मंडळांच्या मिरवणुका वेळेत सुरू होऊ शकल्या नाहीत. परिणामी रात्री दीड वाजले तरी ही दोन मंडळे विसर्जन मार्गातच होती. अजूनही लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता या रस्त्यांवरून येणाऱ्या जवळपास 200 मंडळाचे विसर्जन अद्याप बाकी आहे. त्यामुळे पुण्याची विसर्जन मिरवणूक आणखी 4-5 तास चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :