Pune Crime News : गणेशोत्सवात स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयितांच्या हालचालींवर लक्ष

Pune Crime News : गणेशोत्सवात स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयितांच्या हालचालींवर लक्ष

नारायणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सराईत मोटरसायकल चोरट्याला पकडून त्याच्या ताब्यातून एक मोटरसायकल जप्त केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. गणेश रमेश काकडे (वय २८ रा. माळवस्ती पेठ, ता. आंबेगाव) असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

पुणे जिल्ह्यातील गणपती उत्सवाच्या अनुषंगाने बुधवारी (दि. २७) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस हवालदार दिपक साबळे. विक्रम तापकीर. राजू मोमीन,अतुल डेरे,पोलीस नाईक संदिप वारे, पोलीस जवान अक्षय नवले, निलेश सुपेकर यांचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत होते. यावेळी एक जण मोटारसायकलने मंचर येथून नारायणगावकडे निघाला होता. त्याच्या गाडीला दोन्ही बाजूला नंबर नव्हता.

त्यामुळे त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने बाजूला घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गणेश काकडे सांगितले. या नावाबाबतची माहिती घेतली तो मोटारसायकल चोर असल्याचे समजले. त्याच्यावर यापूर्वी चाकण, खेड, आळंदी, वडगाव मावळ इ. पोलिस स्टेशनमध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. झडतीमध्ये त्याच्याकडे एक स्क्रूड्रायवर तसेच नट, बोल्ट खोलण्याचा पाणा मिळून आला आहे. तसेच त्याच्या ताब्यात मिळून आलेली मोटारसायकल सुद्धा त्याने दोन दिवसांपूर्वी चाकण येथून चोरल्याचे कबुल केले. त्याच्याविरोधात नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news