Pune Ganeshotsav 2023: भर पावसातही पुणेकरांचा उत्साह शिगेला; गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

Pune Ganeshotsav 2023: भर पावसातही पुणेकरांचा उत्साह शिगेला; गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यनगरीची वैभवशाली मिरवणुकीची परंपरा जपत गुरुवारी (दि.२८) सकाळपासूनच मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. परंतु, दुपारी तीन नंतर विसर्जन मिरवणुकीदरम्यान वरुणराजाने हजेरी लावली. मात्र, जोरदार पाऊस बरसत असताना देखील पुणेकरांचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. भर पावसात पुणेकर रेनकोट घालून हातात छत्र्या घेऊन विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. (Pune Ganeshotsav 2023)

दरवर्षीप्रमाणे टिळक चौकात गणेश भक्तांचा आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. ढोल ताशाच्या गजरावर धुंद होऊ नाचत, गुलाल उधळून पुणेकरांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमणार, रवींद्र बिनवडे, उपायुक्त माधव जगताप, अविनाश सकपाळ, संदिप कदम, किशोरी शिंदे, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) किरण पावसकर यांनी गणेश मंडळाचे स्वागत केले. सतीश पालकर यांनी टिळक चौकात सूत्रसंचालन केले.
दरम्यान ढोल ताशा, बँड पथके यांच्यासह पारंपरिक मल्लखांब यांचे खेळ देखील यावेळी पाहायला मिळाले. पुणे पोलिसांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. (Pune Ganeshotsav 2023)

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news