पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी ओरिजिनल सिरीज 'शांतीत क्रांती' ला भव्य यश मिळाल्यानंतर सोनी लिव्ह या मराठी ओरिजिनलचा बहुप्रतिक्षित दुसरा सीझन रिलीज करण्यासाठी सज्ज आहे. समीक्षकांनी प्रशंसित केलेली ही सिरीज प्रेक्षकांना हसवणारी, आपलीशी वाटणारी आणि आत्मपरीक्षणच्या आणखी एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाणारी आहे. कथानकामध्ये नवीन ट्विस्टची भर करत निर्मात्यांनी सिरीजमध्ये दोन नवीन कलाकार प्रियदर्शिनी इंदलकर आणि प्रिया बॅनर्जी यांचा समावेश केला आहे.
संबधित बातम्या
या सीझनमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील उल्लेखनीय परफॉर्मन्ससाठी लोकप्रिय असलेली प्रियदर्शिनी इंदलकर समृद्धीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे, जी श्रेयससोबत अरेंज मॅरेजमधील गुंतागूंतीचा सामना करणार आहे. दुसरीकडे प्रतिभावान अभिनेत्री प्रिया बॅनर्जी सॅन फ्रॅन्सिस्कोमधील एनआरआय कनीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.
'शांतीत क्रांती २' बाबत उत्साह व्यक्त करताना प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली की, 'मला समृद्धीच्या भूमिकेबाबत सांगण्यात आले तेव्हा मी त्वरित या भूमिकेशी संलग्न झाले. ती प्रामाणिक मुलगी असून तिचा खऱ्या नात्यांच्या क्षमतेवर विश्वास आहे. सिरीजमधील तिच्या प्रवासामधून प्रेमाची खरी शक्ती दिसून येते. मी प्रेक्षकांना माझी भूमिका आणि सिरीजमधील श्रेयससोबतचे तिचे नाते पाहताना बघण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.'
सिरीजमधील आपल्या भूमिकेबाबत सांगताना प्रिया बॅनर्जी म्हणाल्या की, 'कनीच्या भूमिकेमध्ये उत्साह व आत्मचिंतनाचे सुरेख संयोजन आहे. माझ्या मते, आमच्या पिढीतील अनेकजण आनंदाचा शोध घेण्याप्रती तिच्या प्रयत्नाशी संलग्न होऊ शकतात. कनीच्या भूमिकेने मला आठवण करून दिली की, जीवनातील सर्वात खास क्षण साध्या आणि सर्वात अनपेक्षित ठिकाणी मिळू शकतात. 'शांतीत क्रांती २' ही भावनांनी भरलेली रोलरकोस्टर सिरीज आहे आणि मला अविश्वसनीय प्रकल्पाचा भाग असण्याचा आनंद होत आहे.'
टीव्हीएफद्वारे निर्मित आणि अरूनभ कुमार यांची निर्मिती असलेल्या या सिरीजचे दिग्दर्शक सारंग साठ्ये व पौला मॅकग्लिन यांनी केलं आहे.
हेही वाचा :