Oscar 2024: ‘2018 एव्हरीवन इज ए हिरो’ला ऑस्करमध्ये भारताकडून मिळाली एन्ट्री | पुढारी

Oscar 2024: '2018 एव्हरीवन इज ए हिरो'ला ऑस्करमध्ये भारताकडून मिळाली एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२४ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून मल्याळम चित्रपट ‘2018 एव्हरीवन इज ए हिरो’ला एन्ट्री मिळालीय. (Oscar 2024) या वृत्ताची घोषणा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली आहे. ‘ 2018 एव्हरीवन इज ए हिरो’ २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या पुराचे भयाण वास्तवावर आधारित कहाणी आहे. चित्रपटामध्ये नैसर्गिक आपत्तीवर माणसाने मिळवलेला विजय दाखवण्यात आला आहे. (Oscar 2024)

२०१८ बेस्ट आंतरराष्ट्रीय फीचर कॅटेगिरीमध्ये ऑस्कर ॲवॉर्डसाठी स्पर्धा असेल. या श्रेणीला पहिले बेस्ट परदेशी फॉरेन चित्रपटाचे टायटल देण्यात आले होते. २००२ मध्ये लगाननंतर कोणत्याही भारतीय चित्रपटाला एन्ट्रीला ऑस्करमध्ये बेस्ट आंतरराष्ट्रीय फिचर चित्रपटासाठी नॉमिनेट करण्यात आले नव्हते. याआधी केवळ दोन अन्य चित्रपट अंतिम पाचमध्ये स्थान मिळवू शकले. हे चित्रपट होते – नरगिस स्टारर मदर इंडिया आणि मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे! २०२३ मध्ये रिलीज चित्रपटांसाठी ९६ वा ऑस्कर १० मार्च २०२४ रोजी लॉस एंजिल्समध्ये आयोजित केला जाईल.

सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट

जूड एंथनी जोसेफ द्वारा दिग्दर्शित चित्रपटामध्ये टोविनो थॉमस, कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लालने महत्त्वाची भूमिका साकारली होती. मे २०१८ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा सुपरहिट ठरला होता. आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा हा मल्याळम चित्रपट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by k a 6 t x (@ka6thii.cutx)

Back to top button