पुढारी ऑनलाईन डेस्क – अनेक कंपन्यांमध्ये आधीपासूनच गुंतवणूक केलेल्या दीपिका पदुकोणने आता कॉफी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. दीपिकाने कंपनीमध्ये किती गुंतवणूक केली आहे, याची माहिती समोर आलेली नाही. (Deepika Padukone) पण कंपनीने म्हटलंय की, दीपिका पादुकोणने कंपनीद्वारा विस्तारासाठी फंड जोडण्यासाठी बी राऊंडचा हिस्सा बनला आहे. तिने आपल्या कंपनीच्या एंटरप्रायझेस (Ka Enterprises) च्या माध्यमातून ब्लू टोकाईमध्ये गुंतवणूक केली आहे. (Deepika Padukone)
दीपिका पादुकोणने गुडगाव येथील स्पेशालिटी कॉफी चेन ब्लू टोकाई कॉफी रोस्टर्स (Blue Tokai Coffee Roasters) मध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे. ब्लू टोकाईने जानेवारीमध्ये ३ कोटी डॉलर जमवले होते. स्टार्टअप कंपनीच्या अन्य गुंतवणूकदारांमध्ये A91 पार्टनर्स, एनीकट कॅपिटल, 8i वेंचर्स, डीएसपी ब्लॅकरॉक, नेजेन कॅपिटल, मौर्यन कॅपिटल, व्हाईट व्हेल वेंचर्स सहभागी आहेत.
का एंटरप्रायझेसची फाउंडर दीपिका म्हणाली, "आम्ही मागील एका दशकात ब्रँडच्या वाढीवर लक्ष ठेवले आहे. यासाठी भारतीय स्पेशालिटी कॉफीला एक्सेसेबल बनवणे, उत्तम कॉफी एक्सपीरियन्स प्रदान करणे आणि ग्लोबल मॅपवर आणण्याचा त्यांच्या प्रवासात आम्ही भागीदार करून खूप आनंदित आहोत."
दीपिका पादुकोण एका कॉफी ब्रँडशी २०१० पासून जोडली गेली आहे.