Aparshakti Khurana : द. आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये अपारशक्ती खुराणाला मिळाला पुरस्कार | पुढारी

Aparshakti Khurana : द. आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये अपारशक्ती खुराणाला मिळाला पुरस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता अपारशक्ती खुराना ( Aparshakti Khurana ) हा नेहमीच त्याच्या अनोख्या अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो. त्याची करिश्माई अभिनायची जादू ही अलीकडे शिकागो येथील प्रतिष्ठित दक्षिण आशियाई चित्रपट इन अमेरिका (SAFA) मध्ये दिसून आली आणि त्याला खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संबधित बातम्या 

प्रत्येक भूमिका अनोख्या पद्धतीने साकारून त्यांना जिवंत करण्याची ताकद अपारशक्तीच्या ( Aparshakti Khurana ) अभिनयातून दिसून येत असते. शिकागो येथील SAFA अवॉर्ड्समध्‍ये त्याला नुकताच एक पुरस्कार मिळाला असून त्‍याच्‍या उल्लेखनीय अभिनय अष्टपैलुत्वावर यातून प्रकाश पडला आहे. त्‍याचा जागतिक प्रभावदेखील सिद्ध झाला आहे.

अपारशक्ती खुराणा यांचा नुकताच झालेला हा सन्मान कमालीचा आहे. ‘स्त्री २’ आणि अॅप्लॉज एंटरटेनमेंटसह ‘फाइंडिंग राम’ या बायोपीकमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button