Shantit Kranti Season 2 : ललित प्रभाकरच्या शांतीत क्रांती-२ चे यादिवशी स्ट्रिमिंग

shantit kranti 2
shantit kranti 2
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पहिल्‍या सीझनला भव्‍य यश मिळाल्‍यानंतर सोनी लिव्‍ह समीक्षकांनी प्रशंसा केलेली त्‍यांची मराठी ओरिजिनल 'शांतीत क्रांती'चा दुसरा सीझन सादर करण्‍यास सज्‍ज आहे. (Shantit Kranti Season 2) १८ महिन्‍यांनंतर एकत्र येत श्रेयस (अभय महाजन) सर्व मुलांना विवाह करत असल्‍याची आनंदाची बातमी देतो आणि तिन्‍ही मुले श्रेयसच्‍या इंटरनॅशनल बॅचलर ट्रिपवर जाण्‍याचे ठरवतात. श्रेयसचा साखरपुडा झालेला नाही, प्रसन्‍नने (‍ललित प्रभाकर) त्‍याच्‍या बाळाला सोबत आणले आहे आणि दिनारने (अलोक राजवडे) बॅचलरच्‍या ट्रिपऐवजी १० अनोळखी व्‍यक्‍तींसह नेपाळला ६ दिवसांच्‍या तीर्थयात्रेवर जाण्‍यासाठी बस बुक केली आहे हे समजल्‍यानंतर स्थिती वेगळे वळण घेते. (Shantit Kranti Season 2)

ललित प्रभाकर म्‍हणाला, "शांतीत क्रांती सीझन १ ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम मिळाले. आम्‍हाला नवीन सीझनसह पुनरागमन करण्‍याचा आनंद होत आहे, जेथे आम्‍ही उलगडे, हास्‍य, ट्विस्‍ट्स, रोमांचने भरलेल्‍या नवीन प्रवासाची सुरूवात करत आहोत."

टीव्‍हीएफची निर्मिती आणि अरूनभ कुमारद्वारे निर्मित शोचे दिग्‍दर्शन सारंग साठ्ये व पौला मॅकग्‍लीन यांनी केले आहे. या सिरीजमध्‍ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर हे स्‍टार कलाकार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news