Bihar Political Crisis : बिहारमधील सत्तांतरामागे ‘पीके’? जाणून घ्‍या काय म्‍हणाले, प्रशांत किशोर

Bihar Political Crisis : बिहारमधील सत्तांतरामागे ‘पीके’? जाणून घ्‍या काय म्‍हणाले, प्रशांत किशोर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमध्‍ये कमालीच्‍या वेगाने राजकीय घडामोडी घडल्‍या. जदयूने (जनता दल युनायटेड ) भाजपशी काडीमोड घेतली. आता नितीशकुमारांनी 'राजद'सोबत ( राष्‍ट्रीय जनता दल ) नवा घरोबा केला. या सर्व घडामोडींचा सूत्रधार कोण, या प्रश्‍नावर राज्‍यातील राजकीय वुर्तळात चर्चा सुरु आहे. अशातच या घडामोडी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर ( पीके ) आहेत, अशी मानले जात आहेत. जाणून घेवूया बिहारमधील सत्तांतरावर प्रशांत किशोर यांचे मत.

एक वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये प्रशांत किशोर ( पीके ) म्‍हणाले की, आज मी जेथे आहे त्‍याच ठिकाणी २०२४ पर्यंत राहणार आहे. माझा संकल्‍प ठरलेला आहे. जगात काय चाललं आहे याच्‍याशी मला देणेघेणे नाही. बिहारमधील राजकीय घडामोडीत माझी कोणतीही भूमिका नाही. आगामी काळात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्‍हान देणारा चेहरा कोण आहे? या प्रश्‍नाचे उत्तर माझ्‍याकडे नाही.

नितीशकुमार भाजपवर नाराज होते

बिहारमधील राजकीय घडामोडींना राष्‍ट्रीय राजकारणाशी जोडणे हे घाईगडबडीचे तसेच चुकीचे होईल. २०१७ नंतर नितीशकुमार हे भाजपबरोबरील युतीवर नाराज होते. त्‍यांच्‍यात काही वैचारिक मतभेद होते. नितीशकुमार यांची देहबोली पाहता हे स्‍पष्‍ट होत होते. नितीशकुमार जोपर्यंत बिहारसाठी चांगले काम करत आहेत तोपर्यंत ते कोणाशी युती करतात याला महत्त्‍व नाही. मात्र त्‍यांनी राजद बरोबर केलेल्‍या आघाडी सरकारचा आता धोरण काय असेल हे बिहारच्‍या जनतेसमोर मांडावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

११५ आमदार असणारा पक्ष केवळ ४३ आमदारांवर आला

नितीश कुमार यांनी गेल्‍या १० वर्षांमधील हा सहावा राजकीय प्रयोग केला आहे. याचा फटका त्‍यांना बसला आहे. एकेकाळी जदयूचे (जनता दल युनायटेड) बिहार विधानसभेत ११५ आमदार होते. आता या पक्षाचे ४३ आमदार आहेत. दरवेळी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्‍यमंत्री होतात, ही वेगळी गोष्‍ट आहे, असा टोलाही त्‍यांनी लगावला. आता बिहारमधील जनता नितीश कुमार यांना मतदान करत नाही. आता पुन्‍हा एकदा त्‍यांनी आपली भूमिका बदलली आहे याचा निश्‍चित परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे, असा अंदाजही प्रशांत किशोर यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news