Bamba Bakya: ‘पोन्नियन सेल्वन-१’ चे गायक बंबा बक्या यांचे निधन

Bamba Bakya
Bamba Bakya

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध तमिळ पार्श्वगायक बंबा बक्या यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले. बंबा बक्या (Bamba Bakya) यांनी मणिरत्नम यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'पोन्नीयन सेल्वन पार्ट १' मधील 'पोन्नी नधी' हे गाणे गायले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सूत्रांच्या माहितूनुसार, गायकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे वृत्त आहे.  (Bamba Bakya)

बंबा बक्‍या यांनी 'पुल्लिनंगल' आणि 'सिमटांगरन' यासारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. रजनीकांत यांच्या २.० या चित्रपटात ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी बंबा बक्या यांना लाँच केले होते. हा चित्रपट शंकर दिग्दर्शित हिट चित्रपट एन्थिरन: द रोबोटचा दुसरा भाग होता. मणिरत्नम यांचा मेगा बजेट चित्रपट 'पोन्नीयन सेल्वन' मधील 'पोन्नी नधी' हे गाणे देखील ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याला बंबा बक्या यांनी आवाज दिला आहे.

बंबा बक्या यांना काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती सुधारण्याऐवजी बंबा यांचे निधन झाले. बंबा यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण तमिळ उद्योगाला धक्का बसला आहे. त्यामुळे संगीतविश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

बंबा बक्या यांच्या निधनावर ए आर रहमानपासून त्यांच्या मुलीपर्यंत ट्विट करून गायकाला श्रद्धांजली वाहिली आहे. ए आर रहमानच्या मुलीने लिहिले, 'मला विश्वासच बसत नाही की तू आता नाहीस.' तिने बक्याला एक अद्भुत व्यक्ती आणि संगीतकार म्हणून शोक व्यक्त केला आहे. यासोबतच ए आर रहमानने देखील शोक व्यक्त करणारे ट्विट केले आणि लिहिले की, "रेस्ट इन पीस ब्रदर…खूप लवकर गेलास.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news