Paytm आयपीओचा गुंतवणूकदारांना झटका; जाणून घ्या नेमका विषय

Paytm आयपीओचा गुंतवणूकदारांना झटका; जाणून घ्या नेमका विषय
Published on
Updated on

Paytm च्या शेअरची वाट पाहत बसलेल्या गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. गुंतवणूकदारांना बंपर लिस्टिंगची आशा होती. पण त्यांना प्रति शेअर 200 रुपयांचा तोटा झाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना नुकसान सोसावे लागले. डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम चालवणारी फिनटेक स्टार्टअप कंपनीच्या IPO अंतर्गत त्याच्या समभागांची लिस्टिंग निराशाजनक झाली आहे. गुरुवारी पेटीएमचे शेअर्स बीएसईवर 1955 रुपये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 1950 रुपयांना बाजारात आले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा शेअर आणखी ब्रेक करत बीएसईवर 1777.50 रुपयांवर पोहोचला. त्याचप्रमाणे NSE वर तो 1776 रुपयांवर पोहोचला.

कंपनीला यातून सुमारे 18,300 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा होती. पेटीएमचा आयपीओ 10 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी बंद झाला होता. कंपनीने या IPO साठी किंमत बँड रु. 2,080 ते Rs 2,150 प्रति शेअर ठेवली होती.

Paytmची स्थापना विजय शेखर शर्मा यांनी केली होती. यूपीच्या अलीगढ जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील आणि एका शाळेतील शिक्षकाचा मुलगा असलेला विजय शर्मा यांचा फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे.

सर्वात मोठा आयपीओ

Paytm IPO हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आहे. याआधी कोल इंडियाने 15,000 कोटी रुपये आणि रिलायन्स पॉवर 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त IPO बाजारात आणला होता. यापूर्वी आलेले दोन्ही मोठे IPO ऊर्जा क्षेत्रातील होते. त्याच वेळी पेटीएम आयपीओ पूर्णपणे तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ आहे.

सुरुवातीला तो 20 टक्क्यांहून अधिक घसरून 1,657 रुपयांवर आला. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. आता ज्यांनी पेटीएमचे शेअर घेतलेले नाहीत ते आनंद घेत आहेत. Paytm चा IPO हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO होता. 18,300 कोटी रुपयांच्या या IPO ला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याला एकूण 1.89 पट बोली मिळाली. ते 8 नोव्हेंबर रोजी उघडले आणि 10 नोव्हेंबर रोजी बंद झाले. याला QIB श्रेणीतील 2.79 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत 1.66 पट बोली मिळाली.

किती हिस्सा विकला

कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम IPO च्या OFS मधील 402.65 कोटी रुपयांपर्यंतची हिस्सेदारी विकली. पेटीएमच्या विद्यमान गुंतवणूकदारांमध्ये अँटफिन (नेदरलँड्स) होल्डिंग्स 4,704.43 कोटी रुपयांपर्यंत, अलीबाबा 784.82 कोटी रुपयांपर्यंत, एलिव्हेशन कॅपिटलव्ही FII होल्डिंग्स 75.02 कोटी रुपयांपर्यंत, एलिव्हेशन कॅपिटल व्ही लिमिटेड 64.04 कोटी रुपयांपर्यंतचा समावेश आहे. III मॉरिशसने रु. 1,327.65 कोटी पर्यंत, सैफ पार्टनर्सने रु. 563.63 कोटी पर्यंत, SVF पार्टनर्सने रु. 1,689.03 कोटी पर्यंत आणि इंटरनॅशनल होल्डिंग्स रु. 301.77 कोटी पर्यंतचे शेअर्स विकले. आयपीओ ही सामान्य गुंतवणूकदारांसाठी कंपनीमध्ये गुंतवणूक करून पैसे कमविण्याची एक संधी आहे. सुमारे 60 टक्के IPO चा गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news