Parineeti-Raghav Wedding : रॉयल आहे राघव चड्ढा यांची सासुरवाडी, सासरे बिझनेसमन तर…

Parineeti-Raghav Wedding
Parineeti-Raghav Wedding

पुढारी ऑनलाईन डेस्क :परिणीती चोप्रा-आप नेते राघव चड्ढा लग्नाच्या बंधनात अडकले. तुम्हाला माहितीये का, राघव चड्ढाची सासुरवाडी किती रॉयल आहे? परिणीती एक पंजाबी कुटुंबातील आहे. परिणीतीचे वडील पवन चोप्रा एक मोठे बिझनेसमन आहे. (Parineeti-Raghav Wedding ) पवन चोप्रा अंबाला कँटोनमेन्‍टमध्ये इंडियन आर्मीसाठी सप्लायरचे कामदेखील करतात. सोबतच पवन चोप्रा यांना गायनाची आवड आहे. (Parineeti-Raghav Wedding )

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

आर्टिस्ट आहे परिणीतीची आई

परिणीतीची आई आणि राघव चड्ढा यांची सासू रीना मल्होत्रा एक एनआरआय आहे. त्यांचा जन्म सिंगापूरमध्ये झाला होता. कधी काळी त्या केन्यामध्ये राहत होते. नंतर भारतात शिफ्ट झाल्या होत्या. परिणीतीची आई एक हाऊसमेकर आणि एक आर्टिस्टदेखील आहे. ती आपली चित्रकला आणि आर्ट एक्झीबिशनसाठी चर्चामध्ये राहते.

परिणीतीला दोन भाऊ

परिणीती चोप्राला दोन भाऊ आहेत. एका भावाचे नाव सहज चोप्रा तर दुसऱ्या भावाचे नाव शिवांग चोप्रा आहे. तिचे दोन्ही भाऊ खूप हँडसम आहेत. सहज चोप्रा बिझनेसमन आहे. त्याचा दिल्लीमध्ये फूड आणि ट्रॅव्हल बिझनेस आहे. शिवांग चोप्रा डॉक्टर आहे. त्याने लंडनमधील मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.

परिणीतीचा चुलत भाऊ सिद्धार्थ चोप्रा पेशाने प्रोफेशनल शेफ आणि प्रोड्यूसर आहे. त्याच्याकडे प्रियांकाचा प्रोडक्शन हाउस Purple Pebble Pictures ची जबाबदारी आहे.

परिणीतीची चुलती आणि प्रियांका चोप्राची कुलकर्णी मधु चोप्रा मल्टीटॅलेंटेड आहे. त्या एक फिजिशियन, बिझनेसवुमनसोबतच चित्रपट निर्मात्या आहेत. मधु चोप्रा यांनी वेंटीलटर आणि बम बम बोल रहा है काशी यासारख्या चित्रपटाची निर्मीती केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news