पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra-Raghav Chadha wedding) आणि आपचे खासदार राघव चड्डा यांचा पंजाबी पद्धतीने उदयपूरमध्ये शाही विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शाही विवाहादरम्यान उदयपूरमधील लीला पॅलेस अगदी पै-पाहूण्यांनी गडबजून गेला होता. बॉलिवूड स्टार्ससोबत अनेक राजकीय नेत्यानीही हजेरी लावली होती. यात टेनिसपटू सानिया मिर्झा, डिझायनर मनिष मल्होत्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते. मात्र, परिणीतीची चुलत बहिण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा शाही विवाहाला उपस्थित राहू शकली नाही म्हणून तिची जोरदार चर्चा झाली. यानंतर प्रियांकाची आई मधू चोप्राने यावर खुलासा केला.
संबधित बातम्या
परिणीती (Parineeti Chopra-Raghav Chadha wedding) आणि राघव यांचा शाही विवाह संपन्न झाल्यानंतर प्रियांकाची आई मधू चोप्रा विमानतळावर स्पॉट होताच तिच्यावर पॉपाराझीच्या कॅमेऱ्याची नजर पडली. यावेळी त्यांनी परिणीती आणि राघव या कपलच्या लग्नाबद्दल आणि प्रियांका का उपस्थित राहिली नाही? यावर प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचे उत्तर देताना मधू यांनी विवाह खूपच छान पार पडला असून दोघेजण कपल सुंदर दिसते होते. प्रियांका तिच्या कामात बिझी असल्याने लग्नाला येवू शकली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सर्व काही व्यवस्थित पार पडले असल्याचे म्हटले आहे.
परिनीतीने तिच्या इन्टावर अधिकृत लग्नाची माहिती देत फोटो शेअर केले आहेत. यात तिने म्हटलं आहे की, "नाश्त्याच्या टेबलावर पहिल्याच गप्पा झाल्यापासून आमची मनं कळत होती. खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होतो.. म्हणून शेवटी मिस्टर आणि मिसेस होण्यात धन्यता मानली! एकमेकांशिवाय जगूच शकत नव्हतो.. आमची कायमची सुरुवात आता.. ?. यानंतर दोघांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा :