Video: परभणी : मासोळी धरण ओव्हरफ्लो

Video: परभणी : मासोळी धरण ओव्हरफ्लो

परभणी : पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठे स्त्रोत असलेले तसेच निम्म्या तालुक्याचा सिंचनाचे आधारवड असलेले माखणी येथील मासोळी धरण ओव्हरफ्लो झाले. बुधवारी सायंकाळी उशिरा १०० टक्के भरल्याची माहिती आहे. मासोळी धरण दुसऱ्यांदा १०० टक्के भरल्याने तालुक्याच्या शेतकऱ्यात आनंद व्यक्त होत आहे.

गंगाखेड शहराच्या पाणीपुरवठाच्या संपूर्ण भार तालुक्यातील माखणी येथील मासोळी मध्यम प्रकल्पावर आहे. गंगाखेड शहरासह तालुक्यातील ११ ते १२ गावांचा पिण्याचा प्रश्न तसेच तालुक्यातील डोंगराळ भागाचा जवळपास सर्व भाग मासोळी धरणावर सिंचनासाठी अवलंबून आहे. तालुक्यात सर्वदूर संततधार सुरू असल्याने डोंगरी भागातील कोद्री, कड्याची वाडी, तांदुळवाडी व डोंगरपिंपळा येथील लघु तलाव संपूर्णपणे भरून वाहत आहेत.

परिणामी, बुधवारी सकाळी मासोळी धरण शंभर भरण्यासाठी केवळ एक फूट शिल्लक होते. सायंकाळी उशिरापर्यंत मासोळी धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती आहे. मासोळी धरण १०० भरल्याने परिसरातील छोट्या मोठ्या नदी-नाल्यांना आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याने मासोळी नदीवरील सर्व गावांना सतर्कतेच्या इशाऱ्याखाली रहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news