पन्नास खोके, चिडलेत बोके : मविआच्‍या आमदारांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

पन्नास खोके, चिडलेत बोके : मविआच्‍या आमदारांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवसही वादळी ठरला. बुधवारी सत्ताधारी आणि विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर भिडले. त्यानंतर आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पन्नास खोके चिडलेत बोके, ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, गुंडगिरी दडपशाहीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, पैसा आमच्या जनतेचा, नाही कुणाच्या बापाचा, शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो, सातवा वेतन न देणार्‍या सरकारचा धिक्कार असो, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बलात्काऱ्यांचा सत्कार करणार्‍या सरकारचा धिक्कार असो अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिया मांडला.

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news