कोल्हापूर : वडगाव परिसरात तरुणाचा अमानुष खून, मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : वडगाव परिसरात तरुणाचा अमानुष खून, मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : हातकणंगलेजवळील अंबप या ठिकाणी शेतात २५ ते ३० वयोगटातील अनोळखी तरुणाचा खून करून मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीला आला. याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

खून झालेल्या तरुणाची गुरुवार दुपारपर्यंत ओळख पटलेली नव्हती. हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, अंबप तालुका हातकणंगले येथील शिवकांत पाटील यांच्या उसाच्या शेतात पाण्याच्या पाटामध्ये एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.

पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड यांनी वडगाव पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पाहणी केली असता मृतदेहाचे हात-पाय दिसून आले नाहीत. शिवाय चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न मारेकरांनी केल्याचे दिसून आले आहे.

अंगावरील सर्व कपडे काढून टाकण्यात आले आहेत. शरिराचा काही भाग सडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. या घटनेमुळे अंबप हातकणंगले परिसरात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news