क्राईम : बिडकीन दरोडेखोरांचा महिलांवर बलात्‍कार प्रकरण : म्‍होरक्‍या ताब्‍यात, आणखी गुन्ह्यांची उकल शक्‍य

अटक
अटक

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात गाजत असलेल्या बिडकीन परिसरातील तोंडोळी दरोडा व दरोडेखोरांचा महिलांवर बलात्‍कार प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पथकाला तैनात करण्यात आले होते. या प्रकरणातील संशयितांना काल (गुरूवार) ताब्यात घेऊन त्‍याची चौकशी केली. या प्रकरणात पोलिसांनी या दरोडेखोरांच्या टोळीच्या म्होरक्यालाच आज शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतले. सदर आरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरोडेखोरांचा महिलांवर बलात्‍कार झाल्‍याच्या घटनेने महाराष्‍ट्र हादरून गेला.

अन्य आरोपींच्या शोधासाठी एकूण ११ टीम तैनात

या प्रकरणातील अन्य आरोपींच्या शोधासाठी एकूण ११ टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना यांच्या आदेशानुसार बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या ७ दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत वस्तीवरील पुरुषांचे हात पाय बांधून त्यांच्या डोळ्यादेखत दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी काल (गुरूवार) दिवसभर बीड पोलिसांची तपासासाठी मदत घेतली. दरोड्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत. मात्र, या पथकात वाढ करून आता तब्बल ११ पथके तैनात केली आहेत. या दरोड्याचा तपास करण्यासाठी आता बीड जिल्ह्याच्या पोलिसांना विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना यांनी आदेश दिल्याने आता पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आहे.

७ ते ८ संशयित ताब्यात

तपासाबाबत न्यायालयात माहिती देऊ बिडकीन परिसरात घडलेल्या दरोड्यातील संतापजनक प्रकारानंतर या गुन्ह्याच्या तपासासाठी ११ पथके तैनात करण्यात आली. मात्र , गुन्ह्यातील तपासाची माहिती आम्ही न्यायालयात सादर करू, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी सांगितले. बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोंडोळी गावातील एका शेतवस्तीवर ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. या संतापजनक घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची ५ पथके तैनात केली होती. या पथकाने अनेक ठिकाणी शोधाशोध करून ७ ते ८ संशयित ताब्यात घेतले. यामध्ये या टोळीच्या म्होरक्याला ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news