

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर येते आहे. बिहारमधील हाजीपूर येथील डेअरीमध्ये अमोनिया गॅसच्या गळतीमुळे एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना शनिवारी (दि.२४) सांगितले. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. (Bihar)
माहितीनुसार, बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरमधील राज फ्रेश डेअरीमध्ये अमोनियम सिलेंडरमधून विषारी वायू गळती झाल्याची घटना घडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस गळतीमुळे एका मजुराचा मृत्यू झाला आहे आणि दुग्धशाळेत काम करणाऱ्या ३० हून अधिक जणांना हाजीपूर सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हाजीपूर सदर हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ श्याम नंदन प्रसाद यांनी सांगितले, दाखल झालेल्या रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
अग्निशमन विभागाचे डीएसपी अशोक कुमार यांनी माध्यमांना सांगितले की, ही घटना समजताच अनेक अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.आम्ही गळतीच्या कारणाचा तपास करत आहोत. परिस्थिती आता नियंत्रणात आहे.
हेही वाचा