Opposition Parties : विरोधकांना धक्का; ईडी, सीबीआय संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सर्वोच्‍च न्‍यायालय (संग्रहित छायाचित्र )
सर्वोच्‍च न्‍यायालय (संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन : १४ विरोधी पक्षांकडून तपास यंत्रणांविरूद्ध दाखल केलेल्या याचिकेवर आज (दि.५) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. दरम्यान  ईडी, सीबीआयचा केंद्राकडून होत असलेल्या दुरूपयोगावरील विरोधकांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देत; सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांची ही याचिका फेटाळली आहे.

सीबीआय, ईडीसह इतर तपास संस्थांचा केंद्राकडून मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्याचे सांगत १४ राजकीय पक्षांनी शुक्रवारी (दि.२४) सर्वोच्च न्यायालयात याचिका (Misuse of ED and CBI) दाखल केली होती. या याचिकेवर आज ५ एप्रिलला सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी 'राजकारण्यांसाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्वे बनवू शकत नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षाची ही याचिका फेटाळली आहे.
केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेत काँग्रेस, आप, राजद, तृणमूल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, द्रमुक, संयुक्त जनता दल, भारत राष्ट्र समिती, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आदी पक्षांचा समावेश होता. विरोधी नेत्यांना तपास संस्थांकडून जाणूनबुजून अटक केली जात आहे. त्यामुळे अटकपूर्व आणि अटकेत्तर मार्गदर्शक तत्वे आखून दिली जावीत, असे विरोधी पक्षांनी याचिकेत म्हटले होते.

तपास संस्थांच्या दुरुपयोगामुळे (Misuse of ED and CBI) लोकशाही धोक्यात आली असल्याचे काँग्रेसचे नेते व ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी याचिका दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. तपास संस्थानी ज्या कारवाया चालविलेल्या आहेत, त्यात ९५ टक्के नेते विरोधी पक्षांचे आहेत. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व आणि अटकेत्तर मार्गदर्शक तत्वे आखणे आवश्यक बनले असल्याचे सिंघवी यांनी नमूद केले होते. विशेष म्हणजे तपास संस्थांचा दुरूपयोग होत असल्याचा आरोप करत ८ राजकीय पक्षांच्या ९ नेत्यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news